Shocking ; धोक्याची सूचना : जगभरातील इंटरनेट, मोबाईलसेवा होणार ठप्प ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मार्च ।। येत्या काळात तंत्रज्ञानाचा फायदा होण्यापेक्षा यच तंत्रज्ञानामुळं घात होण्याची चिन्हं आहेत. कारण ठरणार आहे ते म्हणजे रशियाचा अतिरेक. रशिया अंतराळात अण्वस्र तैनात करणार असल्याची गुप्त आणि तितकीच धक्कादायक माहिती अहवालात उघड झाली आहे. जपान आणि अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये याविरोधात प्रस्ताव सादर केला. रशियाच्या या अँटीसॅटेलाईट अण्वस्त्रांमुळे जगासमोर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

रशिया अंतराळाक स्थापित कपरु पाहणाऱ्या या अण्वस्त्रांचा स्फोट झाल्यास ऊर्जेची प्रचंड लाट निर्माण होईल. ज्यामुळे उपग्रह नष्ट होतील. याचा फटका सर्वच व्यावसायिक आणि सरकारी उपग्रहांवर होईल. थोडक्यात मोबाईल फोन, इंटरनेट सेवा ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. ही सर्व परिस्थिती पाहता सर्वच देशांनी अंतराळातील अण्वस्त्रांना विरोध करायला हवा असं मत अमेरिकेनं व्यक्त केलं आहे. दरम्यान रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. रशिया अशा प्रकारचं कोणतंही शस्त्र तयार करत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तेव्हा आता त्यांचा हा दावा नेमका किती खरा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

एकिकडे रशिया- युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच दुसरीकडे रशिया अंतराळात अण्वस्र तयार करण्याची माहिती समोर आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. अमेरिकेलाही रशियाच्या या निर्णयामुळं हादराच बसला आहे. रशियातील अधिकाऱ्यांनीही बाब फेटाळली असली तरीही आता संपूर्ण जगाचं लक्ष या देशाकडे लागून राहिलं आहे. रशिया भविष्यात या सॅटेलाईट विरोधी क्षेपणास्रांचा गैरवापरही करु शकते अशी भीती तासाला अब्जावधी माहितीची देवाणघेवाण करणारा अमेरिका हा देश आणि अमेरिकन सॅटेलाईटही धोक्यात येऊ शकतात असं म्हटलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *