MS Dhoni Catch : धोनीच्या निवृत्तीचा विचार करणेही चुकीचे ! पहा हा catch

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मार्च । एमएस धोनी 42 वर्षांचा आहे आणि असे म्हटले जात आहे की हा खेळाडू आयपीएलच्या या हंगामानंतर निवृत्त होऊ शकतो. पण सध्या याचा विचार करणेही चुकीचे ठरेल, कारण वयाच्या 42 व्या वर्षी या खेळाडूने एक चमत्कार केला आहे, जो खरोखरच थक्क करणारा आहे. IPL 2024 च्या 7 व्या सामन्यात धोनीने गुजरात टायटन्स विरुद्ध एक अप्रतिम झेल घेतला. हा झेल इतका नेत्रदीपक होता की टीकाकारही धोनीचे चाहते झाले.


अष्टपैलू डॅरेल मिशेलच्या चेंडूवर धोनीने हा अप्रतिम झेल घेतला. मिशेलच्या चेंडूवर विजय शंकरने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटच्या बाहेरील कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. दरम्यान, धोनीने उजवीकडे जबरदस्त डायव्ह टाकत चेंडू पकडला. धोनीचा हा झेल शानदार होता, कारण चेंडू वेगाने स्लिपकडे जात होता. अशा कॅचमध्ये रिॲक्शन टाइम कमी असतो, पण धोनीने ते सोपे केले. हा झेल टिपण्यासाठी धोनीने 2.27 मीटर लांब डाईव्ह मारली, जो 42 वर्षांच्या खेळाडूसाठी खूपच जास्त आहे. धोनीचा फिटनेस इतका अप्रतिम आहे की त्याला हा झेल पकडण्यात कोणतीही अडचण आली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *