YouTube Action : यूट्यूबची भारतावर मोठी कारवाई! तीन महिन्यांत दोन कोटींपेक्षा अधिक चॅनल्स बॅन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मार्च । सध्या कित्येक लोक यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करत आहेत. शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अशाच कित्येक कंटेंट क्रिएटर्सचा सन्मान करण्यात आला. हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठीच असल्यामुळे कोणीही त्यावर व्हिडिओ पोस्ट करू शकतं. मात्र कित्येक लोक, इतर यूट्यूबर्सप्रमाणे मोठे व्हिडिओ बनवता येत नसल्यामुळे या पर्यायाचा विचार करत नाहीत. मात्र, यूट्यूबवर अगदी छोटे व्हिडिओ बनवून देखील तुम्ही पैसे कमवू शकता.

शॉर्ट व्हिडिओंचा फॉरमॅट सगळ्यात आधी टिकटॉक या चिनी अ‍ॅपने आणला होता. हे अ‍ॅप नंतर भारतात बॅन करण्यात आलं. मात्र त्यापूर्वी इन्स्टाग्रामने रील्स आणि यूट्यूबने शॉर्ट्सच्या माध्यमातून ही स्टाईल कॉपी केली होती. यूट्यूब शॉर्ट्समध्ये तुम्ही अवघ्या एक मिनिटांचे देखील व्हर्टिकल (उभे) व्हिडिओ बनवू शकता. या माध्यमातून सध्या कित्येक लोक कमाई करत आहेत.

काय आहेत क्रायटेरिया?
शॉर्ट्सच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला काही नियम व अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

यासाठी तुमच्या यूट्यूब चॅनलला 1,000 सबस्क्राईबर्स असणं गरजेचं आहे.

मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करण्याच्या 90 दिवस आधीच्या काळात तुमच्या चॅनलला 10 मिलियन व्ह्यूज असावेत. किंवा गेल्या 12 महिन्यांच्या काळात चॅनलवर 4,000 तासांचा वॉच टाईम पूर्ण असावा.

कोणत्याही प्रकारची चुकीची, फेक माहिती किंवा एआय जनरेटेड कंटेंट आपल्या चॅनलवरुन प्रसिद्ध झालेला नसावा.

यानंतर तुम्ही यूट्यूब जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावू शकता. याव्यतिरिक्त प्रॉडक्ट प्रमोशन करूनही तुम्ही पैसे कमावू शकता.

‘या’ विषयांवर बनवा शॉर्ट्स
तुमचे व्हिडिओ लोकांनी पहावेत यासाठी ट्रेंडिंग विषयांवर शॉर्ट्स बनवणं गरजेचं आहे. यासोबतच कायमस्वरुपी लोकांच्या कामी येतील अशा विषयांची निवडही फायद्याची ठरते. कित्येक लोक मनोरंजनासाठी यूट्यूबवर येतात, त्यामुळे तशा आशयाचे व्हिडिओही तुम्ही बनवू शकता.

यूट्यूबवर ट्रेंडिंग असणारे काही विषय –

टेक टिप्स

डीआयवाय ट्रिक्स

फॅक्ट्स क्लिप्स

मूव्ही रिव्ह्यू

जनरल नॉलेज

किचन टिप्स

फॅशन टिप्स

मेकअप टिप्स

कॉमेडी व्हिडिओ

मोटिव्हेशनल व्हिडिओ

फायनान्स विषयी सल्ले

डान्स/पेंटिंग/स्केच व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *