जुगाड ; पाण्याची टाकी रिकामी न करता फक्त ५ मिनिटांत काढून टाका गाळ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मार्च ।। घरच्या नळाला पाणी येतं म्हणून ते शुद्धच असेल असा विश्वास ठेवणं म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखंच आहे. नळाला पाणी चांगलं येतं, टाकी पण आपल्याच घरातील आहे पण त्या टाकीत जिथून पाणी येतं ते ठिकाण कसं आहे आपण कुठे बघायला जातो? अनेकदा गढूळ पाणी टाकीत स्थिरावल्यावर वरती असणारं पाणी ही दिसायला स्वच्छ असतं पण त्यातही मातीचे- धुळीचे- चिखलाचे कण मिसळतातच ना? वारंवार गढूळ पाणी येत असल्यास टाकीत गाळाचाच वेगळा थर तयार होतो. आता हा गाळ स्वच्छ करायचा तर सगळी टाकी ओतून टाका, टाकीत आत उतरा आणि स्क्रबने घासा, अशी प्रचंड मेहनत करावी लागते. पण आज आपण असा जुगाड पाहणार आहोत ज्यामुळे टाकीत न उतरता किंवा पाणी न ओतून टाकता सुद्धा आपण गाळ काढून टाकू शकतो. अवघ्या पाच मिनिटांत टाकी स्वच्छ करण्याचा हा उपाय कसा काम करतो, पाहूया..

प्राजक्ता साळवे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्लास्टिकची जुनी बॉटल वापरून केलेला जुगाड दाखवला आहे. आपल्याला तोंडाच्या बाजूने साधारण दोन बोटांइतकं (उभं) अंतर ठेवून बाटली कापायची आहे. मग उरलेल्या बाटलीचा सुद्धा तुम्ही पेन स्टॅन्ड किंवा लहानसं रोप लावण्यासाठी उपयोग करू शकता. त्यानंतर बाटलीच्या कापून घेतलेल्या भागाला खालून बारीक चिरा करायच्या आहेत. बाटली पातळ असल्यास तुम्ही कात्री वापरूनही या चिरा करू शकता (शक्यतो बाटली थोडी पातळच असुद्या) मग तुम्हाला एका साध्या तोटीमध्ये (पाईप) पीव्हीसीचा थोडा बारीक पाईप घालून त्याला एका बाजूने आपल्या बाटलीचं तोंड लावायचं आहे. चिकटपट्टीने नीट बॉटल चिकटवून घ्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही पीव्हीसी पाईपचा तुकडा लावू शकता. एकदा जरी तुम्ही हे टूल बनवले तरी अनेक महिने वापरता येईल.

https://www.instagram.com/prajakta_salve_marathi/?utm_source=ig_embed&ig_rid=2345253d-e717-4cec-b668-e63dc0da1aed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *