एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका राहणार बंद; कधी आहेत सुट्ट्या? बघा RBI ची यादी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ मार्च । एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. आता रिझर्व्ह बँकेने (RBI) एप्रिल महिन्यात बॅंकांना मिळणाऱ्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. एप्रिल महिन्यात कोणत्या राज्यातील बँकांना, कोणत्या दिवशी सुट्ट्या मिळणार? याची यादी दिली आहे. एप्रिल महिन्यात बँकांना तीन-चार नव्हे तर चौदा दिवसांची सुट्टी मिळणार आहे. वेगवेगळ्या सणांबरोबरच शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचाही यामध्ये समावेश आहे.


आरबीआयने राष्ट्रीय स्तरावरील बॅंकाची सुट्ट्यांची यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये बॅंकांसंदर्भातील काही कामे असतील तर त्यासाठी सुट्ट्यांची यादी पाहूनच ग्राहकांना जावे लागेल. एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी आणि केव्हा बँक बंद असेल याबाबत जाणून घ्या. सुट्ट्यांची यादी पाहिल्यावर बॅंकेतील कामांचे नियोजन करता येईल.

जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

7 एप्रिल, 14 एप्रिल, 21 एप्रिल, आणि 28 एप्रिल 2024 रोजी रविवार असल्याने देशभरातील बॅंका बंद असतील.

एप्रिल महिन्यात या दिवशी बॅंका असतील बंद

1 एप्रिल 2024 – अकाऊंट क्लोजिंगमुळे देशभरातील बँका बंद असतील.

5 एप्रिल 2024 – बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जमात उल विदा निमित्त तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

9 एप्रिल 2024- गुढी पाडव्यानिमित्त बॅंका बंद असतील. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळ नाडू, हैदराबाद, आंध्रप्रदेश, मणिपूर, गोवा, जम्मू आणि श्रीनगर.

10 एप्रिल 2024 – रमजान ईद निमित्त कोची आणि केरळ येथेील बॅंका बंद राहतील.

11 एप्रिल 2024 – रमजान ईद निमित्त चंदीगढ, गंगटोक, कोची सोडून देशभरात बॅंका बंद असतील.

13 एप्रिल 2024- महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बॅंका बंद असतील.

15 एप्रिल 2024 – बोहाग बिहू आणि हिमाचल दिवसानिमित्त आसाम आणि हिमाचल प्रदेशमधील बँका बंद राहतील.

17 एप्रिल 2024 – रामनवमीनिमित्त मुंबई नागपूरसह चंदीगढ, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, पाटणा, रांची, शिमला, जयपूर, कानपूर आणि लखनऊ येथील बँका बंद राहतील.

20 एप्रिल 2024 – गरिया पूजा निमित्त त्रिपूरामध्ये बँका बंद राहतील.

27 एप्रिल 2024 – महिन्यातील चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील.

बँकांना सुट्ट्या असल्यामुळे ग्राहकांची कुठली गैरसोय होणार नाही. ग्राहक ऑनलाईन, युपीआय, मोबाईल बँकिंग आणि एटीएमच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक व्यवहार करू शकतात. त्यामुळे सुट्ट्यांचा कोणताही फटका ग्राहकांना बसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *