Pune News: मागील वर्षीच्या प्रमाणे या वर्षी हि पुणे जिल्ह्यावर पाणी संकट कायम ; २६ धरणांमध्ये मिळून ……

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मार्च ।। पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आज अखेरपर्यंत ५६.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक (Water Crisis) आहे. हा उपलब्ध पाणीसाठा गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत ३८.८८५ टीएमसीने कमी आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यावर पाणी संकट कायम असल्याचं चित्र दिसतंय.

गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ९५.१९ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे ४७.९९ टक्के इतके (Pune District Water Crisis) होते. त्यामुळे यंदाचा आज अखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत १९.६० टक्क्यांनी कमी झाला आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे टाटा समूहाची आणि उर्वरित २६ धरणे आहेत. सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतकी आहे. परंतु सध्या फक्त ५६.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला (Pune News) आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाळा फार अडचणीचा जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थित नियोजन करून आणि काटकसरीने वापण्याची गरज आहे.

पुण्यात पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांचा पाणीसाठा किती आहे, ते आपण जाणून घेऊ या. टेमघर धरणातील शिल्लक पाणीसाठा ०.३३ टीएमसी आहे. वरसगाव धरणातील शिल्लक पाणीसाठा ६.६४ टीएमसी (Water Issue) आहे. पानशेत धरणातील शिल्लक पाणीसाठा ४.९६ टीएमसी आहे, तर खडकवासला धरणातील शिल्लक पाणीसाठा १.०८ टीएमसी आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठी कमी होत आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच ही भीषण परिस्थिती आहे. खडकवासला धरण साखळीच्या पाणीसाठ्यात देखील घट झाली (Pune District Water Crisis Update) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं पुणे जिल्ह्यात पाण्याची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही अंशी बिकट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *