मुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मार्च ।। मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवर धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी व निळ्या-सिल्व्हर वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यासाठीची मान्यता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आली आहे.

त्यानुसार, नाशिकसाठीच्या वातानुकूलित टॅक्सीसाठी १०० रुपये, शिर्डीसाठी २०० रुपये अधिक मोजावे लागतील. तर, मुंबई-पुण्याकरिता वातानुकूलित व साध्या टॅक्सीकरिता ५० रुपये अधिक मोजावे लागतील.

मुंबई टॅक्सी संघटनेकडून काही मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्या लक्षात घेत खटुआ समितीच्या अहवालानुसार, भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून नवी भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

मुंबई-नाशिक वातानुकूलित टॅक्सी
आताचे दर नवे दर
४७५ रु. ५७५ रु.
मुंबई शिर्डी वातानुकूलित टॅक्सी
आताचे दर नवे दर
६२५ रु. ८२५ रु.
मुंबई – पुणे साधी टॅक्सी
आताचे दर नवे दर
४५० रु. ५०० रु.
मुंबई – पुणे वातानुकूलित टॅक्सी
आताचे दर नवे दर
५२५ रु. ५७५ रु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *