JIO Customers : महाराष्ट्रात ‘जिओ’ची ग्राहकसंख्या सर्वाधिक ; ‘दूरसंचार नियामका’चा अहवाल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ एप्रिल ।। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारी महिन्यात रिलायन्स जिओने महाराष्ट्रात नवे १.३९ लाख ग्राहक जोडले असून जिओची ग्राहकसंख्या, ४.३२ कोटी झाली आहे. ग्राहकसंख्येच्या आधारावर जिओ महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.

व्होडाफोन- आयडिया म्हणजेच वीच्या ग्राहकसंख्येत तीन लाखांनी घट झाली आहे, तरीही २.२६ कोटी ग्राहकांसह ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारती एअरटेलने ६८ हजार नवे ग्राहक जोडले असून, २.१६ कोटी ग्राहकांसह ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत २२ हजार नव्या ग्राहकांची भर पडली आहे.

वायरलेस सब्सक्रायबर बाजारपेठेतदेखील रिलायन्स जिओ ४६.३२ टक्के ग्राहकांसह पहिल्या स्थानावर आहे .व्होडाफोन-आयडिया २४.२३ टक्के हिश्शासह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारती एअरटेलचा वाटा २३.१२ टक्के असून, ती तिसऱ्या स्थानावर आहे. बीएसएनएल ६.३० टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

जिओने २०२३ मध्ये प्रत्येक महिन्यात ग्राहकसंख्येत वाढ नोंदवली असून जिओच्या फाइव्ह-जी सेवेलासुद्धा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच उकला या संस्थने केलेल्या पाहणीनुसार जिओच्या फाइव्ह-जी विस्तारामुळे भारताने फाइव्ह-जी सेवेत पहिल्या १५ देशांमध्ये स्थान मिळवले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *