Team India Squad WC 2024 : … टी-20 वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपर म्हणून कोण खेळणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ एप्रिल ।। T20 World Cup 2024 Team India Squad : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या हंगामात भारतातील आघाडीच्या खेळाडूंसोबतच अनेक युवा खेळाडूही चमकदार कामगिरी करत आहेत. आणि या स्पर्धेवर निवड समितीचे बारीक लक्ष आहे. कारण आयसीसी वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघाची निवड कधी पण केल्या जाऊ शकते.

यंदाच्या हंगामात तीन यष्टीरक्षक फलंदाजही फलंदाजी करत आहेत. ज्यामध्ये ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन यांची नावे आहेत. तसेच युवा जितेश शर्माही या शर्यतीत मागे नाही. दरम्यान, महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲडम गिलख्रिस्टने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कोण विकेटकीपर असला पाहिजे यावर मोठे वक्तव्य केलं आहे.

ॲडम गिलख्रिस्ट क्रिकबझवर म्हणाला की, “माझ्या मते, ऋषभ पंतला कोणत्याही किंमतीत जागा मिळायला हवी. यासोबतच मला संजू सॅमसनलाही संघात ठेवायला आवडेल. इशान किशनही चांगली कामगिरी करत आहे. यात काही शंका नाही. पण, मला वाटते की ऋषभ पंतचे नाव टी-20 वर्ल्ड कपसाठी लॉक केले जावे.”

डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावलेला ऋषभ पंत आयपीएलच्या या हंगामात मैदानात परतला. आणि या हंगामात पंत संघाचे नेतृत्व करत आहे. पंतने आतापर्यंत सहा सामन्यांत 157.72 च्या मजबूत इकॉनॉमी रेटने 194 धावा केल्या आहेत. या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सॅमसन चौथ्या स्थानावर आहे.

बाकीच्यांबद्दल बोलायचं तर… इशान किशन सध्या मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 182.95 च्या स्ट्राइक रेटने 161 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 69 आहे. तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संजूने 6 सामन्यात 3 अर्धशतकांसह 246 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे जितेश शर्माला फलंदाजीचे कौशल्य दाखवण्याची फारशी संधी मिळालेली नाही. या उजव्या हाताच्या फलंदाजाने पाच सामन्यांत केवळ 77 धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *