Maharashtra Weather: राज्यात तापमानवाढीचा कहर ; डोक्यावर सूर्य येण्याअगोदच तापमान चाळीशी पार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ एप्रिल । राज्यामध्ये सध्या तापमान वाढ होत आहे. पुणे, मुंबई शहरांमध्ये (Mumbai Pune Temperature) उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये सध्या तापमानवाढीचा कहर पाहायला मिळतोय. डोक्यावर सूर्य येण्याअगोदरच म्हणजेच दुपारी बारा वाजण्याअगोदरच अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार असल्याचं पाहायला मिळालं आहे.

महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई आणि रायगड यांसारख्या शहरांसाठी एक वेगळी चेतावणी हवामान विभागाने जारी केली आहे. या आठवड्यात उष्णतेची लाट अपेक्षित असल्याचं त्यांनी (Heat Wave Alert In Mumbai Pune) सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि ठाण्यात किमान तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

राज्यातील अनेक शहरांमधील तापमान आज दुपारी बारा वाजण्याअगोदर चाळीस अंशांच्या पुढे असल्याचं समोर (Maharashtra Weather Update) आलं आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे तर उकाड्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तापमान वाढीमुळे उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. राज्यात सध्या सूर्य आग ओकत असल्याचं चित्र दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यात सोमवार म्हणजेच १५ एप्रिल आतापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस ठरला आहे. त्यादिवशी जिल्ह्यात तापमान चाळीशीपार गेले होते.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड (Maharashtra Weather) शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. जिल्ह्यातील एकूण सरासरी तापमान ४१ अंश सेल्सिअस (Weather Update) होते.

पुढील काही दिवसांत विदर्भातील तापमान ४२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमान देखील ४० अंशांच्या पुढे आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातमध्येही तापमानात मोठी वाढ (Maharashtra Temprature) झाली आहे. नाशिकमध्येही सरासरी तापमान ३९ अंशांवर पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळमध्ये १८ एप्रिलपर्यंत आणि पश्चिम बंगाल, ओडिशा, गोवा, गुजरात आणि कर्नाटकमध्ये १६ एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला (Heat Wave Alert) आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये १६ ते १८ एप्रिल या कालावधीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने उच्च तापमानाला सामोरे जावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *