महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती करते. त्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेती अधिक विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील सर्व शेतकऱ्यांना खास ओळखपत्र देण्यात येणार आहे. यावर शेतकऱ्यांचा युनिक १२ अंकी नंबर देण्यात येणार आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार आहे. या कार्डचा फायदा काय होणार? यासाठी रजिस्ट्रशेन कुठं अन् कसं करायचं? हे जाणून घ्या.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी
शेतकऱ्यांसाठी खास डिजिटल आयडी कार्ड बनवण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला हे ओळखपत्र देण्यात येणार आहे. या आयडीमुळे शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा घेता येणार आहे. या डिजिटल आयडीमुळे योजनांचा रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे. (Farmer Digital Card)
काय काम होणार?
पीएम किसान योजना, आरोग्य कार्ड या योजनांचा फायदा एका आयडीमधून घेता येणार आहे. या डिजिटल आयडी कार्डमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा डेटा तयार केला जातो. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मदत निधी उपलब्ध होण्यासाठी तसेच तुम्ही वेगवेगळ्या योजनांसाठी पात्र आहात की नाही हे कळणार आहे. त्यामुळे योग्य वेळी निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला जाणार आहे. (Farmer digital Card News)