Sharad Pawar on Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांबद्दलचं ‘ते’ विधान, पवारांनी दिलं स्पष्टीकरण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ एप्रिल ।आधी मुलगा, साहेब मग लेक आता सुनेला म्हणजेच सुनेत्रा पवारांना निवडून द्या, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पावर असं वक्तव्य केलं होतं. या विधानावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार भावुकही झाल्या होत्या. त्यावर आता शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मी फक्त अजित पवार यांच्या वक्तव्या संबधी स्पष्टीकरण दिले.

तसेच महिलांचा आदर करण्याचा विषय असेल तर या देशात महिलांचा आदर करणारा निर्णय घेणारा मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेत त्यांना एक विशिष्ठ स्थान देण्याचा निर्णय माझा होता. तसेच केंद्रात स्वरक्षण मंत्री असताना तिन्ही दलात मुलींना सहभागी करून घेण्याचा निर्णय माझा होता , महिला संबधी असे अनेक काही निर्णय मी घेतले आहेत कि त्यात त्यांना सन्मान आणि आदर मिळेल कारण नसताना एखादा शब्द धरून चुकीचे वातावरण तयार करण्याला काही अर्थ नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले, साताऱ्यात ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *