Income Tax: करोडो करदात्यांवर आयकर विभागाची आहे करडी नजर; वाचा संपूर्ण माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ एप्रिल ।। देशभरातील तब्बल दीड कोटीहून अधिक आयकरदाते इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आले आहेत. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच आयकर भरण्याची लगबगही सुरू होते. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही (२०२४) आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून त्यानंतर निर्धारित दंड भरून करदाते ३१ डिसेंबरपर्यंत विलंबित आयटीआर भरू शकतील. मात्र दरवर्षी आपल्या उत्पन्नाची सरकारला माहिती देणे उपलब्ध असूनही बरेच करदाते असे आहेत, ज्यांनी टॅक्स रिटर्न्स भरले नाहीत. असेच सुमारे १.५२ कोटी करदात्यांवर टॅक्स विभाग लक्ष ठेवून आहे.

आयकर अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात करदात्यांची एकूण संख्या सुमारे ८.९ कोटी करदाते होती तर ७.४ कोटी लोकांनी रिटर्न फाइल केले आहेत. मात्र यामध्ये सुधारित आयकर रिटर्नचाही समावेश असल्यामुळे आयटीआर न भरणाऱ्यांची संख्या आणखी वाढल्याचे दिसून आले असून हे असे करदाते आहेत ज्यांनी टॅक्स किंवा TDS भरला आहे.

एका अहवालानुसार, सुधारित रिटर्नसह एकूण १.९७ कोटी लोकांनी आयटीआर दाखल केलेले नाहीत तर यापैकी १.९३ कोटी वैयक्तिक श्रेणीतील, २८ हजार हिंदू अविभक्त कुटुंबातील (HUF) आणि १.२१ लाख कंपन्या होत्या तर उर्वरित इतर विविध श्रेणींचा समावेश होता. दुसरीकडे, फिल्ड अधिकाऱ्यांना योग्य डेटा आणि माहितीसह अशा व्यक्तींशी संपर्क साधण्यास सांगितले असून त्यांना आयटीआर दाखल करण्याची आवश्यकता का आहे हे समजावून सांगितले आहे.

करदात्यांना IT विभागाची नोटीस
सीबीडीटीच्या माहितीनुसार अंदाजे आठ ते नऊ हजार संभाव्य करदात्यांना इन्कम टॅक्स नोटीस पाठवल्या जात असून अशा लोकांविरोधात विभागाकडे जास्त तिकीट खरेदी किंवा जास्त रोख ठेवीची नोंद आहे. असे करदाते जर विलफुल डिफॉल्टर आढळल्यास त्यांना दंड भरावा लागेल, पण ज्या करदात्यांच्या उत्पन्नात अचानक वाढ होण्याचे खरे कारण आहे त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल किंवा विवरणपत्र भरावे लागेल.

प्राप्तिकर विभागदेखील मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या डेटावर अवलंबून असून यामुळे अशा नॉन-फायलर्सची ओळख पटवण्यात आणि कोणतीही विसंगती शोधण्यात मदत मिळाली आहे. गेल्या महिन्यात आगाऊ (ॲडव्हान्स) कर संकलनामुळे १७ मार्चपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १९.८८% वाढून १८.९० लाख कोटींहून अधिक झाल्याचे CBDT ने सांगितले. यामध्ये १८,९०,२५९ कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात (१७ मार्चपर्यंत) ९,१४,४६० कोटी कॉर्पोरेशन कर (CIT) आणि सिक्युरिटीज व्यवहार कर (STT) आणि ९,७२,२२४ कोटी वैयक्तिक आयकर यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *