UPSC CSE 2023 अंतिम निकाल जाहीर, आदित्‍य श्रीवास्‍तव देशात प्रथम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ एप्रिल ।। केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा 2023 (UPSC CSE 2023 ) अंतिम निकाल आज ( दि.16 एप्रिल) जाहीर करण्यात आला. निवडलेल्या 1016 उमेदवारांची यादी (UPSC टॉपर्स लिस्ट 2023) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिलेल्‍या माहितीनुसार, आदित्य श्रीवास्तव देशात अव्वल आला आहे. अनिमेश प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या सर्व उमेदवारांची यादी UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. (UPSC CSE 2023 Final result )

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2023 साठी १ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिसूचना जारी केली होती. 28 मे २०२३ रोजी पूर्व परीक्षा झाली. याचा निकाला 12 जून रोजी जाहीर झाला होता. मुख्य परीक्षा 15 ते 24 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. मुख्‍य परीक्षेचा निकाल 8 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाला होता. त्‍यानंतर मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीचा तिसरा टप्पा पार पडला. यानंतरआज अंतिम निकाल जाहीर झाला आहे.( UPSC CSE 2023 Final result )

UPSC (UPSC CSE 2023 सिलेक्ट लिस्ट) द्वारे नागरी सेवा परीक्षेच्या निकालांतर्गत 2023 च्या परीक्षेसाठी घोषित केलेल्या रिक्त जागांसाठी विविध श्रेणींमधून निवडलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

UPSC 2023 अंतिम निकालातील पहिले १० उमेदवार
आदित्य श्रीवास्तव
अनिमेष प्रधान
डोनुरु अनन्या रेड्डी
पी के सिद्धार्थ रामकुमार
रुहानी
सृष्टी दाबस
अनमोल राठोड
आशिष कुमार
नौशीन
ऐश्वर्याम प्रजापती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *