World Liver Day 2024 : सल्ल्याशिवाय औषध घेता, यकृताला बिघाडाकडे नेता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ एप्रिल ।। मद्यपान हे यकृत विकाराचे मुख्य कारण आहे. परंतु जंक फूडचे अतिसेवन, धुम्रपान, कामाचा ताण अशा नेहमीच्या वाईट सवयींमुळे यकृताच्या विकारात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिप्रमाणात औषधी घेतल्यास यकृताच्या कार्यात बिघाड होण्याचा धोका आहे.

एकदा यकृताचा आजार झाला की, व्यक्ती मृत्यूच्या दाराजवळ पोचतो. नकळत येणारा आजार असल्याने यकृत विकाराने अखेरच्या घटका मोजत असताना उपचारासाठी येतात. या स्थितीत यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्यात नसतो. देशात यकृताचा कॅन्सर आणि सायरोसिसमुळे तब्बल दीड लाखावर व्यक्ती दगावतात.

दरवर्षी २ लाख यकृताने आजारी व्यक्ती अखेरच्या क्षणी निदान होते. त्यातच अलीकडे बदललेली जीवनशैली आणि मद्यपानाचे अधिक सेवन जीवघेण्या दीर्घकालीन यकृत विकारांचे प्रमुख कारण ठरत आहे. मधुमेह आणि लठ्ठपणा हे देखील यकृत विकारास कारणीभूत ठरतात. अशा विकारांना बळी पडणाऱ्यांचे वय हे ४० ते ६० वयोगटातील आहे.

यकृत विकारांची लक्षणे

पोटात जडपणा

पोटदुखी,

अन्नपचन

भूक मंदावणे

उलट्या व मळमळ,

कावीळची लागण

उलटीद्वारे रक्त

पोट फुगणे

पायाला सूज

यकृताचे विकार

हिपॅटायटीस बी

साधा कावीळ

फॅटी लिव्हर

लिव्हर सिरॉसिस

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *