Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल ।। Electricity Price Hike News In Marathi: राज्यात सध्या उन्हाळ्याचे चटके बसत आहेत. अनेक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढून अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर वाढू लागला आहे. अशापरिस्थितीत अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका सुमारे 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.

गेल्या महिनाभरापासून मुंबईकरांना उन्हाचा झळा सोसावे लागत आहेत. अशातच आता मे महिन्यापासून सर्वसामान्यांना वीज दरवाढीच्या झळाही सहन कराव्या लागणार आहेत. अदानी कंपनीने गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील 318 कोटी 38 लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला असता. याबाबत आयोगाने सोमवारी मान्यता दिली. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते 24 या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाईल. वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाईल.

कुणाला किती भुर्दंड?
मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट 70 पैसे ते 1.70 रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे. मे महिन्यापासून दरमहा 0-100 युनिट वीज वापर असणाऱ्या निवासी ग्राहकांकडून प्रति युनिट 70 पैसे, 101-300 युनिटसाठी 1.10 रुपये , 301-500 युनिटसाठी 1.5 रुपये आणि 500 हून अधिक वीजवापरासाठी 1.70 रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहे.

उन्हाच्या चटक्यासोबत महावितरणाचा शॉक
सध्या राज्यात उन्हाचे चटके बसत आहेत. अनेक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत हवामान आणखी उष्ण होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंची वापरा वाढत आहेत. अशा स्थितीत वीज दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे उन्हाच्या चटका वाढलेला असताना अदानी वीज दरवाढ करुन एकप्रकारे नागरिकांना शॉक दिला आहे.

महाराष्ट्रात सर्वात महागडी वीज
दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीजदरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. पण महाराष्ट्राचा विचार केला तर वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *