T20 World Cup 2024 : वर्ल्डकपसाठी अशी असणार खेळपट्टी…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल ।। आयपीमधील खेळपट्ट्या फलंदाजीस फारच पोषक आहेत; पण विंडीजआणि अमेरिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी असणाऱ्या खेळपट्ट्या संथ असतील, त्यामुळे डाव सावरणाऱ्या खेळाडूंचे महत्त्व अधिक असेल, असे मत डेव्हिड वॉर्नरने मांडले.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या संथ तर असतीलच; पण फिरकीसही काही प्रमाणात साथ देणाऱ्या असतील, त्यामुळे आयपीएलमध्ये होत असलेली फटकेबाजी तेथे होणार नाही. कॅरेबियन लीगमुळे मी तेथे बरेच क्रिकेट खेळलो आहे, असे वॉर्नरने सांगितले.

२०१० मध्येही आम्ही तेथे विश्वकरंडक स्पर्धा खेळलो तेव्हाही भरभरून धावा होतील, अशा खेळपट्ट्या नव्हत्या. त्यामुळे डाव उभारणारा खेळाडू माईक हसी याचा आम्हाला त्यावेळी उपयोग झाला होता, असे वॉर्नर म्हणाला. त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत या दोन्ही ठिकाणी होणारे सामने सूर्यप्रकाशात (डे गेम) होणार आहेत, त्यामुळे खेळपट्टी रफ होईल आणि चेंडू वळू लागतील, हा महत्त्वाचा फरक असणार आहे, असा मुद्दाही वॉर्नरने मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *