बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे मिळणार 10 दिवसात , पहा RBI च्या सोप्या टीप्स

Spread the love

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ३१ मार्च ।सध्याचं युग म्हणजे डिजीटल युग आहे. त्यामुळे रोखीच्या व्यवहारांप्रमाणेच ऑनलाईन व्यवहाराला अनन्य साधारण महत्त्व आलंय. मात्र, डिजीटल व्यवहार होत असताना याच काळात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्येही वाढ झालीय. त्यामुळेच आरबीआयने यावर काही उपाययोजना केल्या आहेत (How to get back your money if cheated in Online fraud transaction of bank).तुम्ही किंवा तुमच्या परिचयाची एखादी व्यक्तीही अशा ऑनलाईन फ्रॉडचा बळी ठरण्याची शक्यता आहे. या ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल फ्रॉड किंवा सायबर फ्रॉडमध्ये हॅकर्स संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती हॅक करत बँक खात्यातून पैसे चोरतात. त्यामुळे तुम्हाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते. कारण पैसे कसे परत मिळवायचे हे माहिती नसतं. मात्र, आता आरबीआयने अशा प्रकरणांमध्ये पैसे परत मिळवण्याबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ याची माहिती संबंधित बँकांना देण्यास सांगितले आहे. त्यामुळे तुमचं होणारं नुकसान टळू शकतं. रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, “जर ऑनलाईन व्यवहारात तुमची फसवणूक झाली, तर त्याबाबत तात्काळ बँकेला कळवा. त्यामुळे तुमचं नुकसान कमी होईल किंवा काहीच नुकसान होणार नाही.”

बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्यावर तक्रार केल्यावर आपले पैसे आपल्याला परत कसे मिळणार असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. त्याचं उत्तर आहे बँकांनी अशा फसवणुकीच्या संकटाची शक्यता गृहीत धरुन काढलेल्या विमा पॉलिसी. बँका ग्राहकांच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी आता विमा कंपन्यांकडून पॉलिसी काढतात. त्यामुळे तुम्ही फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर संबंधित बँका याची माहिती विमा कंपन्यांना देतात. यानंतर विमा कंपन्या बँकेच्या पॉलिसीनुसार नुकसान भरपाई करतात. हेच पैसे बँका ग्राहकांना देतात.

जर तुमची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक झाली तर त्याबाबत तुम्ही 3 दिवसांच्या आत बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. असं केल्यास तुमचं कोणतंही आर्थिक नुकसान होणार नाही. कारण अशा स्थितीत आरबीआयने बँकांना 10 दिवसात ग्राहकांचे फसवणूक झालेले पैसे देण्याचे निर्देश दिले आहेत. असं असलं तरी ग्राहकांनी बँकेतील पैसे चोरीला केल्याची तक्रार 4 ते 7 दिवसांनंतर दिली तर संबंधित ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंतचं नुकसान सहन करावं लागू शकतं, असंही आरबीआयने स्पष्ट केलंय.

जशी बँक आपल्या खात्यांवरील पैशांच्या सुरक्षेसाठी विमा काढते, तसाच विमा तुम्हीही व्यक्तिगत पातळीवर काढू शकता. बजाज अलायन्स आणि HDFC अर्गोसारख्या विमा कंपन्या अशा प्रकारचा विमा पुरवतात. या विम्यामुळे तुमच्या बँक खात्यात कोणताही घोळ झाला तर तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *