सहा दिवसानंतर सोन्याच्या किमतीत वाढ ; चांदी दरात मोठी घसरण ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३१ मार्च । गुंतवणूक (gold Investment) म्हणून सोनं हा उत्तम पर्याय आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात मागील ६ दिवसापासून घट दिसत आहे. मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचा दर ४३६२० रुपये प्रति १० ग्रॅम होता तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४४६२० रुपये प्रति १० ग्रॅम होता , जवळपास ४५ हजार एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागत आहेत , त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करू शकता.

गुड रिटर्न वेबसाईट नुसार आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्याचा दर ४३,६३० रुपये प्रति १० ग्रॅम होता तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४४६३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे . तर चांदी च्या भावात २४०० ची घट होऊन प्रति किलो ६३,१०० / रु. प्रति किलो आहे .

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात.हे. तर येत्या 2 महिन्यात चांदीचे दर 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असतील. अन्य अभ्यासकांच्या मते सोन्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता असून हे दर 45,000 रुपयांवरुन 48,000 रुपयांवर पोहोचतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *