महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पिंपरी चिंचवड । दि. ३१ मार्च । रावेत च्या जलउपसा केंद्रात दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी (1 एप्रिल) पिंपरी-चिंचवडच्या संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठाही विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आलं आहे. (Pimpri Chinchwad Water supply will be cut off Tomorrow)
पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या काम करण्यात येणार आहे. यासाठी उद्या (1 एप्रिल) गुरुवारी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर हे दुरुस्ती काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे शहरात होणार सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.