आला उन्हाळा तब्येत सांभाळा ; यूरिन इन्फेक्शनच्या वेदना थांबवण्यासाठी आहारातून वगळा ‘हे’ पदार्थ

Spread the love

महाराष्ट्र २४- दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात जर युरिनरी ट्रक किंवा लघवीच्या संबंधी काही त्रास सुरू झाल्यास होत असलेल्या वेदना या असह्य असतात. युरिनरी ट्रॅक इंफेक्शन (UTI) ही समस्या सगळ्यात जास्त महिलांना जाणवत असते. काही प्रमाणात पुरूषांना सु्द्धा होत असते. यामध्ये युरिनरी सिस्टिमचे अवयव म्हणजेच यूरेथ्रा, ब्लॅडर, किडनी यांमध्ये इन्फेक्शन होत असते. यामुळे लघवी करताना जळजळ होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी पूर्ण न होणे, लघवी करताना रक्त बाहेर पडणे असा त्रास होतो.

आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही या समस्येपासून स्वतःला लांब ठेवू शकता. आहारातून काही पदार्थांचे सेवन वगळले तर तुम्ही या आजारांपासून लांब राहू शकता. ईकोलाई बॅक्टीरिया यूटीआयचं कारण आहे. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अनेक कारणांमुळे होत असतं. त्यामुळे युरिनरी ट्रॅकचा आकार बदलू शकतो. कॉनट्रासेप्टिक पिल्सचे सतत सेवन, प्रेग्नंसी, मेनॉपॉज या गोष्टी जबाबदार असतात.

कॅफिन यूटीआईची समस्या झाल्यानंतर चहा, कॉफी यांसारख्या कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन पुर्णपणे बंद करा. त्यामुळे तुमच्या रक्ततात सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे शरीरातील इन्फेक्शन होत असलेल्या पदार्थांचं सेवन करू नका.

मादक पदार्थ यूटीआईचे इन्फेक्शन झाल्यानंतर दारूचे सेवन केल्यास त्रास जास्त तीव्रतेने होण्याती शक्यता असते त्यामुळे पोटात आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये जळजळ वाढण्याची शक्यता असते. तसंच गोड पेय सुद्धा आहारातून वगळावीत कारण त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते.

मसालेदार खाद्य पदार्थ तेलकट आणि मसालायुक्त खाद्यपदार्थांचा आहारातून समावेश कमी करावा. कराण त्यामुळे बॅक्टीरीया जास्त वाढण्याची शक्यता असते. शरीरातील एसिडचे प्रमाण मसालेदार पदार्थामुळे वाढत असते. म्हणून जर तुम्हाला युटीआयची समस्या जाणवत असेल तर आहारातून तिखट आणि जास्त मसालेदार पदार्थ वगळा.
उपाय
शरीरसंबंध करण्यापूर्वी आणि केल्यानंतर लघवी करून मूत्राशय व मूत्रमार्ग साफ करावा.
आठ-दहा ग्लास पाणी रोज प्यावे. यामुळे मूत्राशयातील जिवाणू शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते
महिलांचे अंतर्वस्त्र हे स्वच्छ असावे.
शक्यतो सार्वजनीक टॉयलेटचा वापर करू नका.

टीप : सदर माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे , अधिक माहीती साठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *