विजेशिवाय चालणारा पहिला फ्रीज; किंमतही तुमच्या खिशाला परवडणारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । स्टिकमुळे पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानामुळे पुन्हा एकदा मातीच्या भांड्यांचा वापर वाढला आहे. बाजारात पारंपरिक मातीची भांडी, कुंड्या, मडकी याव्यतिरिक्त आता मॉर्डन किचनमध्ये वापरली जाणारी अनेक भांडी, टेबलवेयरचीही रेंज उपलब्ध आहे. एवढंच नाही, तर काही देशी कंपन्याही अशा आहेत, ज्या विजेवर न चालणाऱ्या मातीच्या फ्रीजचीही विक्री करत आहेत.

मॉर्डन किचनमध्ये वापरली जाणारी जवळपास सर्व भांडी आता मातीपासूनही बनवली जातात. तवा, पॅन, बॉटल, कुकर, बिर्याणी पॉट, ताटं, वाट्या, ग्लास, चमचे आणि आता फ्रीजही मातीपासून तयार करण्यात आला आहे. या वस्तूंची किंमत 70 रुपयांपासून ते 8000 रुपयांपर्यंत असते. यात सर्वात महागडी वस्तू मातीचा फ्रीज आहे.

बाजारातील दुकानांसह, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही मातीची भांडी विक्रीसाठी आहेत. मिट्टीकूल.कॉम, राजेंद्र क्‍ले हँडिक्राफ्ट.कॉम, जिस्‍ता.कॉम, माटीसुंग.कॉम आणि क्‍लेहॉटपॉट्स.कॉम अशा वेबसाइट्सद्वारे ही भांडी खरेदी करता येऊ शकतात. अॅल्युमिनियम, नॉन-स्टिकमध्ये जेवण बनवणं शरीरास नुकसानकारक ठरू शकतं. परंतु मातीच्या भांड्यात जेवण शिजवण्याचे आणि खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पर्यावरणालाही नुकसान होत नाही.

मातीच्या भांड्यांचा असा करा वापर –

– कोणतंही नवं मातीचं भांडं खरेदी केल्यानंतर त्यात कमीत-कमी 24 तास पाणी भरुन ठेवा किंवा एखाद्या मोठ्या पाण्याच्या भांड्यात मातीचं भाडं बुडवून ठेवा. त्यानंतर मातीचं भांडं सुकवून त्याचा वापर करा.

– मातीच्या भांड्यात जेवण बनवताना गॅस अधिक फास्ट ठेवू नका. तसंच गरम मातीचं भांडं गॅसवरुन खाली उतरवल्यानंतर ते दगडी स्लॅबवर थेट खाली ठेवू नका. भांड्याखाली स्टँडचा वापर करा किंवा गॅसवरच ते थंड होऊ द्या.

– मातीची भांडी धुण्यासाठी राख, माती किंवा बेकिंग पावडरचा वापर करा. भांड्यांच्या स्क्रबऐवजी नारळाच्या किशीचा वापर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *