बळीराजाची दिवाळी उडदावरच, दर घसरल्याने सोयाबीनच्या साठवणूकीवर भर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । खरीप हंगामात शेतकऱ्यांना केवळ उडीद या पीकाने तारलेले आहे. (Arrival in Urad Market) शेतकऱ्यांची दिवाळी देखील उडदावरच होणार असल्याचे चित्र आहे कारण सोयाबीनची साठवण करुन उडदाच्या विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. (Latur Market) दोन दिवसांपासून सोयाबीनची आवक ही कमी झाली असून उडदाला अधिकचा दर असल्याने साठवणुकीतला उडीद आता बाजारात येत आहे. शिवाय दरही चांगला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मात्र, (Soyabean Rate Down) दरवर्षी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत असते ती जागा आता उडदाने घेतली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजारात उडदाला 7200 चा दर मिळाला आहे. तर सोयाबीनचे दर 100 रुपयांनी वधारले आहेत.

खरीप हंगामात झालेले नुकसान आणि बाजारातील दर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. शिवाय रब्बीची पेरणी आणि दिवाळी सण तोंडावर अससल्याने समस्यांमध्ये अधिकची भरच पडलेली आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तारलेले आहे ते उडीद या पिकाने. हंगामाच्या सुरवातीपासून उडदाला कायम दर राहिलेला आहे. अद्यापही 7300 चा मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. भविष्यात उडदाला जास्तीचा दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. पण सोयाबीन कवडीमोल दरात विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी उडीद विक्रीचा पर्याय निवडला आहे.

उडदाची आवक वाढली
दोन दिवसाखाली लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही जास्त होती. मात्र, सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घसरत असल्याने शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची साठवणूक करण्यावर भर दिलेला आहे. मात्र, ज्याची चलती आहे अशा उडदाची आवक बाजारपेठेत वाढत आहे. कारण उडदाला 7242 चा दर मिळत असून गेल्या अनेक दिवसांपासून दर हे स्थिर आहेत. शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार पोत्यांची आवक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उडदाची साठवणूक तर खराब सोयाबीनची विक्री करण्याचा निर्धार केला होता. मात्र, सोयाबीनचे दर अधिकच घटत आहेत. शिवाय पावसामुळे सोयाबीन हे डागाळल्याने 4 हजारापर्यंतच दर मिळत आहे. त्यामुळे आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची साठवणूक तर उडदाची विक्री असेच चित्र बाजारातील आहे.

दिवाळी अन् रब्बीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत
शेत जमिनीतील ओल उडण्यापूर्वी रब्बी हंगामातील पेरणी होणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा ओलवून पेरण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावणार आहे. त्यामुळे रब्बीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, शेतीमालाचे दर घटत असताना दुसरीकडे बियाणे आणि खताचे दर हे वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे दिवाळीचा सणही आहे. त्यामुळे उडीद विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

शेतकऱ्यांना प्रतीक्षा नुकसानभरपाईची
खरीपातील पीक नुकसानभरपाईची केवळ प्रक्रिया सुरु आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर ना शासनाची मदत पडलेली आहे ना विमा कंपन्यांची. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळायला हवी ही भूमिका कृषी आयुक्त तसेच राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतलेली आहे. मात्र, विमा कंपन्यांच्या वेळकाढूपणामुळे दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *