उन्हाळ्यात उष्णतेचे सगळे रेकॉर्ड मोडनार ; केरळमध्ये तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या वर पोहोचले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० मार्च । मार्च महिन्याची सुरुवात होऊन अवघे 10 दिवस झाले आहे. हा महिना संपून मे महिना उजाडायला अवधी आहे. मात्र असं असलं तरी देशाच्या बहुसंख्य भागात अतितीव्र उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. केरळवासी या उन्हाळ्यामुळे प्रचंड हैराण झाले असून केरळमध्ये काही भागातील कमाल तापमान हे 54 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. केरळमध्ये यंदाच्या या उन्हाळ्याने उष्णतेचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. केरळ आपत्ती व्यवस्थापनाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की केरळच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये तापमान 54 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. या अतितीव्र उन्हाळ्यामुळे उष्माघाताचा धोका वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे.

केरळमधल्या तिरुअनंतपुरमधील अलपुझ्झा, कोट्टायम, कन्नूर जिल्ह्यातील काही भागात तामपान 54 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. गुरुवारी केरळच्या बहुतांश भागातील तापमान हे 45 ते 54 डिग्री सेल्सियस दरम्यान होते. कारसगोड, कोढिकोड, मलप्पुरम, पठानमथिट्टा आणि एन्राकुलममध्ये तापमान 40 ते 45 डिग्री सेल्सियसदरम्यान होते. इडुक्की आणि वायनाड सारख्या डोंगराळ भागातील तापमान 29 डिग्री सेल्सियसच्या आसपास होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *