उपचार कमकुवत पचन विकारांवर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मार्च । पचन विकारांमध्ये अग्रीचा प्रकोप वाढतो, कमी होते किंवा तो ठराविक स्थितीतच राहातो. अग्नीचा प्रकोप वाढल्यामुळे पचनक्रिया वाढते. परिणामी शरीरात आमही वाढतो. अग्री कमी झाल्यास अन्न पचन व्यवस्थित होत नाही आणि अल्सर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून आयुर्वेदिक तज्ज्ञ वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करतात.

पारंपरिकरित्या ज्या वनस्पती अग्री प्रदिप्त करतात त्यांना ‘दिपान्स’ असे म्हणतात. त्यामध्ये लवंग, चित्रा, हिंग यांच्याबरोबरच त्रिकटू याचा समावेश असतो. ज्यावेळी अग्नी मंद झालेला असतो तेव्हा या वनस्पतींचा उपयोग होतो. तसेच कमकुवत पचनादरम्यान वायूसुद्धा वाढतो. त्यासाठीही यांचा उपयोग होतो. इतर वनस्पती अग्नीचा परिणाम संतुलित राखण्याचा प्रयत्न करतात. तसेच अग्नी प्रदिप्त करून पित्त वाढण्याची प्रक्रियाही कमी करतात. या वनस्पतींमध्ये कोथिंबीर, बडिशेप आणि जिरे यांचा समावेश होतो. यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय कुठल्याही प्रकारचे गॅस, जळजळ असे त्रास वाढत नाहीत.

समानवायू
समानवायूवर उपचार करायचा असल्यास पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढवावी लागते. त्यासाठी बडिशेप, जिरे, कोथिंबीर या वनस्पती उपयोगाच्या ठरतात. प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःचा असा एक विशिष्ट आयुर्वेदिक गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळे ते समानवायू नियमित करतात. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये नियमितता आणल्यास समानवायूसुद्धा संतुलित होतो. आपली दैनंदिनी ही नियमित आणि संतुलित असते तेव्हा समानवायू संतुलित राहतो. त्यामुळे इतर क्रियासुद्धा संतुलित राहतात. वात आणि अग्रीमध्येसुद्धा नियमितपणा येतो.

अपानवायू
अपानवायू ही खालच्या दिशेने घडणारी क्रिया असून यामध्ये वायू मळाद्वारे बाहेर टाकला जातो. यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यास बद्धकोष्टता, डायरिया होतो. वातामुळे जुलाब होत असल्यास योगार्टमध्ये पाणी टाकून घ्यावे, त्रास कमी होतो. बरेचदा अपानवायू हा पित्तासोबत एकत्र असतो. त्यासाठी लाल रासबेरी, थोड्या प्रमाणात सेलियम घेतल्यास आराम पडतो. बरेचदा अपानवायू वाढल्यामुळे मळ घट्ट होतो आणि बद्धकोष्टतेचा त्रास होतो. अशा वेळी तेल असलेल्या वनस्पती आणि अन्न पदार्थ उपयुक्त ठरतात. शतावरी, लिकोराईस या वनस्पती उपयुक्त ठरतात. त्रिफळा चूर्ण हे यावर सर्वसामान्यपणे गुणकारी ठरते. ज्यावेळी अपान हा कफामुळे अडकतो तेव्हा त्यावर एरंडेलचे तेल किंवा त्रिवित गुणकारी ठरते.

आमावरील उपचार
आपण खातो ते अन्न व्यवस्थित पचले तर त्यातून आहार रस तयार होतो. आहार रस पुढे संपूर्ण शरीराचे पोषण करतो. उरलेला मलभाग मळ, मूत्र, घाम वगैरे मलांच्या रूपाने शरीरामधून बाहेर टाकला जातो, पण पचन व्यवस्थित झाले नाही तर जो अर्धवट पचलेला आहार रस तयार होतो त्याला ‘आम’ असे म्हणतात. आम दुर्गंधीयुक्त असतो व अतिशय चिकट व बुळबुळीत असतो. शरीरातील आम वाढल्यानंतर तो काढून टाकणे महत्त्वाचे असते. कारण तो वेगवेगळ्या आजारांसाठी कारणीभूत ठरतो. आम वाढल्यानंतर तज्ज्ञ वैद्यांच्या निरीक्षणाखाली

रुग्णावर उपचार करावे लागतात. त्यासाठी पंचकर्म उपचार पद्धतीचा वापर करावा लागतो. ही शरीर शुद्धिकरणाची प्रक्रिया आहे. रुग्णाची शारीरिक क्षमता बघून पंचकर्माचे वेगवेगळे उपचार केले जातात. कारण, या उपचार पद्धतीमुळे शरीरातील बरेचसे घटक पदार्थ बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे वजन कमी होते. रुग्णाला जर एखादा जुनाट आजार असेल आणि अशक्तपणा असेल तर अशा वेळी शुद्धीकरणाची उपचार पद्धती वापरताना काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये थोडा बदल करून अधिक काळजीपूर्वक पद्धतीने शुद्धिकरण करावे लागते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *