लाखो रुपयांचे ओपन जीम साहित्य चोरी; सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार

Spread the love

पिंपरीः लाखो रुपये खर्च करून नागरिकांना व्यायाम करण्यासाठी ओपन जीम सुविधा उपलब्ध करून दिली होती मात्र ओपन जीम साहित्य चोरुन विल्हेवाट लावण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना व्यायाम करण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निगडी भक्ती शक्ती उड्डाण पूल ते त्रिवेणी नगर स्पाईन रोड यमुनानगर भागातील स्कीम नंबर 11 बिल्डिंग क्रमांक ४८ समोरील जॉगिंग ट्रॅकमध्ये सन २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाकडून ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात आले होते. गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी या ओपन जीम साहित्याची चोरी झाली व विल्हेवाट लावण्यात आली असून त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करून पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात ओपन जीम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तर दुसरीकडे ओपन जीम साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार घडत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत. ओपन जीममुळे नागरिक सकाळ, संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी ह्या ठिकाणी येतात पण ओपन जीम साहित्य चोरीला गेल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन त्या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *