गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, शांत राहणं माझी हतबलता: प्राजक्ता माळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२८ डिसेंबर ।। पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींची नावे घेत आरोप केले होते. आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय.

अभिनेत्री, लेखिका, निर्माती प्राजक्ता माळी हिनं आज शनिवार २८ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली तिथं ती बोलत होती. तिनं सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

हतबलता म्हणून मी शांत बसले
गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे. पण हतबलता म्हणून मी शांत बसले. लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, तेव्हा बोलणं गरजेचं, असल्याचं प्राजक्तानं म्हटलंय. राजकारणात महिला कलाकरांना का खेचता असा रोकठोक सवाल यावेळी प्राजक्तानं विचारला.

जाहीर माफी मागावी
बीडमध्ये कधी पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्हा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर, त्यांच्या कतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, यातून तुमची मानसिकता दिसते, असं म्हणत प्राजक्तानं सुरेश धस यांना सुनावलं आहे. तर त्यांनी माझी जाहीर माफी मागी, माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचंही त्यांनी नाव घेतलं, त्यांचीही माफी मागावी, अशी मागणी तिने केली.

प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं याचं भान नाही, हे त्यांनी शिकून घेतलं पाहिजे, असंही तिनं म्हटलं. अशा लोकांमुळे आमचं कलाक्षेत्र बदमान होत असल्याचंही प्राजक्ता म्हणाली.

करुणाताई तुम्हाला मिळलेली माहिती चुकीची आहे, असंही प्राजक्ता माळीनं यावेळी स्पष्ट केलं. तर महिला आयोगाकडे त्यांचीही तक्रार केली आहे, पण त्यानंतर त्या गप्प होत्या, म्हणून मी नंतर शांत होते,असंही तिनं यावेळी स्पष्ट केलं.

कायदेशीर मार्गाने कारवाई करेन
तिथं बीडमध्ये बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना तुमची गाडी कलाकारांवर का घसरते? हे सगळं कितपत योग्य आहे, तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. त्यांनी माफी मागितली नाही तर, कायदेशीर मार्गाने माझ्या वकिलांमार्फत कारवाई करेन, असंही तिनं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *