चिंचवड शाहूनगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यान सर्वांसाठी निःशुल्क करावे

Spread the love

उद्यानाची वेळही वाढविण्याची सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर ।  पिंपरी-चिंचवड ः लाखो रुपये खर्च करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी चिंचवड येथील शाहू नगर मध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यान सुरू केले. 6 मार्च 2022 रोजी सुरू झालेल्या या उद्यानाची वेळ वाढवून देण्यात यावी. तसेच या उद्यानातील प्रवेश निःशुल्क करण्यात यावा, जेणेकरून अबाल-वृद्धांना या उद्यानाचा लाभ घेता, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

चिंचवड येथील शाहू नगरमधील अटल बिहारी वाजपेयी उद्यान वेळ सकाळी सहा ते आठ तर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत असून, उद्यान वेळ मर्यादा ठेवण्यात आली असून, नागरिकांचा हिरमोड होत आहे. तसेच दहा वर्षांखालील मुलांचे तिकीट दहा रुपये तर प्रौढ व्यक्तींचे २० रुपये ठेवण्यात आले असून, अटलबिहारी वाजपेयी उद्यान तिकीट शुल्क रद्द करण्यात यावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या उद्यानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्यानाचा तिकीटदर ज्यादा आकारण्यात येत असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी ताबडतोब दखल घेऊन अटलबिहारी वाजपेयी उद्यान तिकीट रक्कम रद्द करण्यात यावी. तसेच अटलबिहारी वाजपेयी उद्यान वेळ वाढविण्यात यावी. मर्यादित वेळेचे बंधन नको, अशी नागरिकांची मागणी असून, त्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच या उद्यानामध्ये फोटोग्राफीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जात आहे. तेही रद्द करण्यात यावे.

नागरिकांना विरंगुळा म्हणून उद्यान विकसित केले जात असताना भरमसाट शुल्क आकारले जात आहे. त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी नागरिक येत असून वेळ मर्यादा वाढविण्यात यावी. उद्यानात दुकान गाळा टेंडर प्रक्रिया राबवून सुद्धा बंद अवस्थेत आहेत. ते गाळे महिला बचत गटांना विना अट देण्यात यावेत, अशीही मागणी काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *