कोलंबोत ‘कोसळधार’, PAK vs SL सामन्यात पावसाची ‘बॅटिंग’, पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ सप्टेंबर । आशिया चषकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीला उशीर होत असून अद्याप पावसाची कोसळधार सुरू आहे. भारताविरूद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी आज आशिया चषकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होत आहे. ‘आशियाई किंग्ज’ श्रीलंका आणि यजमान पाकिस्तान यांच्यातील विजयी संघ रविवारी रोहितसेनेशी अंतिम सामना खेळेल. दोन्हीही संघ आपल्या शेवटच्या सामन्यात भारताकडून पराभूत होऊन इथे पोहचले आहेत.


दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे अद्याप नाणेफेक झाली नाही. खरं तर आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर नेट रनरेटमुळे श्रीलंका अंतिम फेरीत प्रवेश करेल.

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ –
बाबर आझम (कर्णधार), इमाम-उल-हक, मोहम्मद हारिस, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, झमान खान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *