मुस्लिम समाजास 5% शैक्षणिक आरक्षणास अजितदादा अनुकूल : शिंदे, फडणवीसांशी चर्चा करणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ सप्टेंबर । मुस्लिम समाजाला ५% शैक्षणिक आरक्षण देण्यासाठी न्यायालयाचा कोणताही अडसर नाही. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी आढावा बैठकीत सांगितले. या वेळी अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. मौलाना आझाद महामंडळाच्या कर्ज योजनांची सांगड केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेशी घालता येईल का, हेही तपासून घेण्याची सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना केली.

संभाजीनगर येथील हज हाऊस तातडीने सुरू करण्याबाबत निर्णय झाला असून त्याचे लवकरच उद्घाटन केले जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरातील वक्फ बोर्डाची जागा जीवन प्राधिकरणाने ताब्यात ठेवली असून ती बोर्डाला परत मिळाली पाहिजे, या मागणीबाबत चर्चा करण्यात आली, या संदर्भातदेखील अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या समितीने योग्य तोडगा काढावा, असे पवार म्हणाले. अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. या आयुक्तालयासाठी प्रौढ शिक्षण विभागाचे कर्मचारी वर्ग करता येतील का हे तपासून पाहा, असे पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *