रेडझोन समस्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखविणार

Spread the love

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा इशारा

पिंपरी चिंचवडः पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळवण्यासाठी गेल्या ४६ वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा, म्हणून विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु, राजकीय दबावामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येत नाही तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन हद्दीतील बांधकामांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन परवाना देत नाही. बेकादेशीर बांधकाम म्हणून रेड झोन हद्दीतील बांधकाम पाडले जात आहे. रेडझोन आणि साडेबारा टक्क्यांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावावा यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र यावर ठोस भूमिका काहीही घेतली जात नाही. याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखविणार आहोत, असा ईशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 5ऑक्टोबर 2023 रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन रद्द करण्यात यावा तसेच पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते काळभोर यांच्या मागण्या…
रेडझोन हद्दीतील जागेवर बँक लोन होत नाही. इतर नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित क्षेत्र २००० यार्ड रद्द करण्यात येऊन ५०० मीटर रेड झोन क्षेत्र जाहीर करण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *