हा नेदरलँड्सचा नाही भारताचा संघ आहे! भगव्या जर्सीत दिसली टीम इंडिया, चेन्नईत सुरू केला सराव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर | वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला अखेर आजपासून सुरूवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात उद्घाटनीय लढत सुरू आहे. यजमान भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्या सामन्यासाठी भारतीय संघ आज मैदानावर सरावासाठी उतरले अन् तेही भगव्या जर्सीत… नेदरलँड्सचा संघ ऑरेंज आर्मी म्हणून ओळखला जातो, परंतु आज टीम इंडियाची आर्मी ऑरेंज झाली दिसली. भारतीय संघाचा हा नवा सराव किट आहे.

आम्ही या स्पर्धेत आमचा सर्वोत्तम खेळ करू आणि वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असा विश्वास रोहितने काल व्यक्त केला होता. तो पुढे म्हणाला की,” मागील तीन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये यजमान संघ जिंकला आहे, पण या गोष्टीचा मी जास्त विचार करत नाही. आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू आणि या स्पर्धेचा मनापासून आनंद लुटू. आम्ही आमच्या रणनीतीची कशी अंमलबजावणी होईल हे पाहू आणि आमच्या कौशल्याचा पूर्ण वापर करून वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करू.”

https://x.com/KohliSensation/status/1709855305197408273?s=20

तो पुढे म्हणाला,”मी या स्पर्धेत सहभागी संघांच्या कर्णधारांना आणि खेळाडूंना एक खात्री देऊ इच्छितो की भारतात होणारा हा वर्ल्ड कप तुम्हाला थक्क करेल आणि भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या तुम्ही प्रेमात पडाल. माझ्यामते खेळाडूला तुम्ही स्वातंत्र्य दिले की तो त्याच्या संपूर्ण क्षमतेनं खेळतो. कर्णधार म्हणून खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक देणे ही माझी जबाबदारी आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *