World Cup 2023 : यंदाचा वर्ल्डकप न्यूझीलंड जिंकणार, अजब योगायोग आला जुळून

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर | Cricket World Cup Coincidence : भारतात होत असलेला विश्वचषक न्यूझीलंड जिंकणार…? होय विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अजब योगायोग जुळून आला आहे. डेवेन कॉनवे याने विश्वचषकातील पहिले शतक ठोकले अन् न्यूझीलंडच्या विश्वविजयाची स्क्रिप्ट लिहिली. होय… मागील 4 विश्वचषकाचा इतिहास पाहता यंदा न्यूझीलंड विश्वचषकावर नाव कोरणार… असे म्हटल्यास वावगं वाटायला नको. 2007 च्या विश्वचषकापासून ज्या संघाने पहिले शतक ठोकले, त्या संघाने चषकावर नाव कोरले आहे.

2007 पासून सुरु झाला अजब योगायोग –

मागील 16 वर्षांपासून जो संघ विश्वचषकात पहिले शतक ठोकतो, तो चॅम्पियन होतो, असाच योगायोग जुळून आला आहे. 2007 मध्ये रिकी पाँटिंगने विश्वचषकातील पहिले शतक ठोकले होते. 2007 च्या विश्वचषकात श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजय चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर 2011 मध्ये टीम इंडियाचा सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवान याने विश्वचषकातील शतक ठोकले होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंकेचा पराभव करत भारताने चषक उंचावला होता. 28 वर्षांनंतर भारतीय संघ विश्वविजेता झाला होता. योगायोग इथेच संपत नाही.. 2015 आणि2019 च्या विश्वचषकातही असेच घडले होते.

2015 च्या विश्वचषकातही असाच योगायोग पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या ऑरोन फिंच याने 2015 च्या विश्वचषकातील पहिले शतक ठोकले. त्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करत चषकावर नाव कोरले. 2019 च्या विश्वचषकातही यजमान इंग्लंडच्या जो रुट याने पहिले शतक ठोकले होते. अयॉन मार्गनच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत चषक उंचावला. आता 2023 च्या विश्वचषक न्यूझीलंडच्या डेवेन कॉनवे याने शतक ठोकले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *