David Warner: डेव्हिड वॉर्नर नावाच वादळ थंड ; आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा ; शेवट कडू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुन ।। गेली १५ वर्षे ऑस्ट्रेलियासाठी कसोटी, एकदिवसीय व टी-२० अशा तीनही प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर याने सोमवारी रात्री आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि अफगाणिस्तानने मंगळवारी बांगलादेशला पराभूत केले. यामुळे ऑस्ट्रेलियाचे टी-२० विश्‍वकरंडकातील आव्हान सुपर आठ फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीचा शेवट कडू ठरला.

बांगलादेशविरुद्धच्या लढतीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर याने निवृत्तीबाबत संकेत देताना म्हटले होते की, पुढील २० ते ३० वर्षांच्या कालावधीत मला सँडपेपर प्रकरणाने (चेंडूशी छेडछाड करणे) ओळखले जाईल.

पण मला माहीत आहे की, क्रिकेटवर निस्मिम प्रेम करणाऱ्या व्यक्ती या खेळामध्ये बदल घडवून आणणारा खेळाडू म्हणून माझ्याकडे बघतील. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना मी घडवलेल्या बदलाबाबत मत व्यक्त केली जातील.

उल्लेखनीय यश
– दोन एकदिवसीय विश्‍वकरंडक पटकावलेल्या संघाचा सदस्य

– एक टी-२० विश्‍वकरंडक पटकावलेल्या संघाचा सदस्य

– एक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेल्या संघाचा सदस्य

डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कसोटी

सामने – ११२, धावा – ८७८६, शतके – २६, अर्धशतके – ३७

एकदिवसीय

सामने – १६१, धावा – ६९३२, शतके – २२, अर्धशतके – ३३

टी-२०

सामने – ११०, धावा – ३२७७, शतक – एक, अर्धशतके – २८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *