निगडी येथील भक्ती शक्ती उद्याना पाठीमागील अग्रसेन महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणास महापालिकेला विसर

Spread the love

 पिंपरीः निगडी भक्ती शक्ती उद्यान पाठीमागे अग्रवाल समाज धर्मगुरू अग्रसेन महाराजांचा पुतळा सुशोभीकरण करण्यात येत नाही. एक वर्ष मुदत संपली आहे. सुशोभीकरणाचा प्रस्ताव २ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला मात्र दीड वर्षाचा काळ उलटूनही आज तागायत स्मारक “जैसे थे” परिस्थितीत आहे. अग्रसेन महाराजांची जयंती 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशीच आहे. मात्र अग्रसेन महाराज यांच्या जयंतीपूर्वीच या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडावा अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे.

महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण करण्यात आले. मात्र राजकीय दबावामुळे अग्रवाल समाज धर्मगुरूं अग्रसेन महाराज पुतळा सुशोभीकरण करण्यात येत नाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह दुटप्पी भूमिका घेत आहेत. अग्रवाल समाजातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी ताबडतोब दखल घेऊन अग्रवाल समाज धर्मगुरूं अग्रसेन महाराज पुतळा सुशोभीकरण करण्यात यावे. अन्यथा नागरीक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील याची नोंद घ्यावी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण करण्यात आल्या नंतर उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी अग्रवाल समाज धर्मगुरूं अग्रसेन महाराज पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी साधी पाहणी केली नाही तसेच अग्रवाल समाज धर्मगुरूं अग्रसेन महाराज पुतळा सुशोभीकरण का करण्यात येत नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.

विशेष बाब म्हणजे, राजकीय दबावामुळे अग्रवाल समाज धर्मगुरूं अग्रसेन महाराज पुतळा सुशोभीकरण करण्यात येत नाही ही बाब गंभीर असून त्या संदर्भात महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन अग्रवाल समाज धर्मगुरूं अग्रसेन महाराज पुतळा सुशोभीकरण करण्यात यावा. अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *