How To Look Younger : चाळीशीत तरूण दिसण्यासाठी हे फॉलो करा ; चेहरा कायम उजळेल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर |

Skin Care Routine :
वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे सामान्य आहे. मात्र बऱ्याचदा महिला यासाठी अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतात. चेहऱ्यातील कोलेजन आणि नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते. तुमचा चेहरा फ्रेश असेल तर तुमचं वयही लगेच दिसून येत नाही. यामुळे लोक त्वचेची काळजी घेण्यावर जास्त लक्ष देतात. पण जीवनशैली, आहार आणि त्वचेची काळजी न घेतल्याने वाढत्या वयाबरोबर सुरकुत्या अधिक ठळक होऊ लागतात.

तुम्ही थकल्यावर तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सहज दिसून येतात. तेव्हा इच्छा नसतानाही म्हातारपण स्वीकारावे लागते. वयाच्या चाळीशीनंतरही जर तुम्हाला सुंदर दिसायचे आहे, तर हे स्किन केअर रूटीन न चुकता दररोज फॉलो (Follow) करा काही आठवड्यातच मिळेल त्वचेला ग्लो. जाणून घ्या


स्क्रबिंग करा
वृद्धत्वाचे परिणाम थांबवण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा चेहरा (Face) स्क्रब करणे फार महत्वाचे आहे. यामुळे चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि घाण सहज साफ होते, ज्यामुळे चेहरा निरोगी दिसतो.

मॉइस्चराइज करणे महत्वाचे आहे
वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावरील ऑईलॉ कमी होऊ लागते. ऑईल नसल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि सुरकुत्या वाढू लागतात, त्यामुळे हे टाळण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझेशन ठेवणे गरजेचे आहे.

सनस्क्रीन आवश्यक आहे
जर तुम्ही फक्त उन्हाळ्यात बाहेर जातानाच सनस्क्रीन वापरत असाल तर असे न करता प्रत्येक ऋतूमध्ये वापरले पाहिजे. तुम्हाला 40 नंतरही तरुण दिसायचे असेल तर सनस्क्रीन नक्कीच लावा.

खूप पाणी प्या
त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे पाणी (Water) पिणे देखील खूप महत्वाचे आहे . पाणी प्यायल्याने शरीरातील घाण लघवीद्वारे बाहेर पडत राहते, यामुळे चेहरा स्वच्छ आणि तरुण राहण्यास मदत होते.

नाईट क्रीमचा वापर
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर नाईट क्रीम लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि वृद्धत्वाचा प्रभावही कमी होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *