India vs Pakistan : 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अजूनही खेळला जाऊ शकतो भारत अन् पाकिस्तान, जाणून घ्या समीकरण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । India vs Pakistan World Cup 2023 : सोमवारी 23 ऑक्टोबरला पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप 2023 मध्ये मोठा धक्का बसला, जेव्हा संघाला अफगाणिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

एकदिवसीय वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाला. त्यामुळे पाकिस्तान संघाची उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली होती, मात्र 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची आशा अजूनही कायम आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये भारताने मोठा विजय मिळवला. या दोघांमधील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला आणि त्यानंतर भारताने दोन सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने दोन्ही सामने गमावले आहेत.

अशा स्थितीत टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त आहे, पण पाकिस्तानला उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, तरच टीम स्वबळावर सेमीफायनलमध्ये पोहोचेल.

भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तर दोघांमध्ये आणखी एक सामना होऊ शकतो. भारताचा संघ पहिल्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला तर उपांत्य फेरी सामना होणे शक्य आहे.

याशिवाय भारत दुसऱ्या क्रमांकावर आणि पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर असला तरीही सामना शक्यतो आहे, मात्र तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी पाकिस्तान संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

या दोघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला तर तो कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. त्याचवेळी उपांत्य फेरीत भारताचा सामना इतर कोणत्याही संघाशी झाला तर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *