महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२७ डिसेंबर ।। सध्या मेलबर्नमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर सिरीजमधील चौथा सामना खेळवला जातोय. मात्र या सामन्यात दरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे खेळाडू काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरले होते. याचं कारण म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल टीम इंडियाच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काली पट्टी बांधून टीम इंडिया उतरली मैदानात
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हातावर काळ्या पट्टी बांधल्या आहेत. डॉ.मनमोहन सिंग 2004 ते 2014 या कालावधीत सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधान होते.
बीसीसीआयने एक निवेदन जारी करून लिहिलंय की, ‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झालेल्यांच्या स्मरणार्थ टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळ्या हातावर पट्टी बांधली आहे.’
1991 च्या आर्थिक सुधारणांचं नेतृत्व करण्याचं श्रेय प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना देण्यात येतं. मनमोहन सिंग यांनी भारताला गंभीर आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास खूप मदत केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे आर्थिक उदारीकरण सुरू झालं, ज्याने त्यानंतरच्या दशकांमध्ये भारताच्या वेगवान आर्थिक विकासाचा पाया घातला गेला.
डॉ. मनमोहन सिंग यांना गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास एम्स रूग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. AIIMS ने 26 डिसेंबर रोजी एका बुलेटिनमध्ये म्हटले होते की, ‘त्याच्यावर वयोमानानुसार वैद्यकीय उपचार सुरू होते आणि ते घरीच अचानक बेशुद्ध पडले.’
तत्काळ घरी त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. रात्री 8.06 वाजता त्यांना दिल्ली एम्समध्ये आणण्यात आणण्यात आलं होतं. सर्व प्रयत्न करूनही त्यांना शुद्धीवर आणता आलं नाही. रात्री ९.५१ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.