World Cup 2023 : या कारणासाठी अजय जडेजाने केला होता पाकिस्तानला फोन?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर | 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तान आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. या स्पर्धेतील 22 व्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा एकतर्फी 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 7 गड्यांच्या मोबदल्यात 282 धावा केल्या, पण एवढ्या मोठ्या धावसंख्येचाही अफगाणिस्तान संघाने सहज पाठलाग केला. अफगाणिस्तान संघाच्या प्रत्येक खेळाडूने या विजयात 100 टक्के योगदान दिले. नूर अहमद आणि नवीन उल हक यांनी गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली, तर त्यानंतर इब्राहिम झद्रान, रहमानउल्ला गुरबाज, रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी अप्रतिम फलंदाजी करत पाकिस्तानचे मनोधैर्य तोडले. मात्र, अफगाणिस्तानच्या या विजयात भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाचाही मोठा वाटा आहे. तो संघाचा मार्गदर्शक असून त्याचा अनुभव अफगाणिस्तानसाठी उपयुक्त ठरत आहे.

अजय जडेजाने भारतासाठी 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि या खेळाबद्दलची त्याची समज अप्रतिम आहे. साहजिकच त्याचा सल्ला अफगाणिस्तानच्या खेळाडूंना उपयोगी पडला. तुम्हाला सांगतो की अफगाणिस्तान संघाने विश्वचषकापूर्वी अजय जडेजाला व्यवस्थापनात सामील केले होते. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक राशिद लतीफने जडेजाच्या अफगाण संघात सामील होण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

अफगाणिस्तानचा मेंटॉर होण्यापूर्वी अजय जडेजाने आपल्याला फोन केला होता, असा दावा राशिद लतीफने पाकिस्तानी मीडियाशी केलेल्या संवादात केला आहे. जडेजाने राशिदला विचारले होते, की अफगाणिस्तान संघ कसा आहे? यावर राशिदने जडेजाला सडेतोड उत्तर दिले. रशीद जडेजाला म्हणाला, ‘तू त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करशील, पण शेवटी अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून तुला खूप काही शिकायला मिळेल.’

अजय जडेजा या संघाचा चाहता आहे. जडेजाचा असा विश्वास आहे की अफगाण संघाने जेवढी सुधारणा केली आहेस, तेवढीच खेळ सुधारण्यासाठी इतर संघांना 50 ते 100 वर्षे लागली असती. अवघ्या 20 वर्षात हा संघ खूप शक्तिशाली झाला आहे. लवकरच हा संघ जगातील सर्वात धोकादायक संघ ठरेल, असा विश्वास जडेजाने व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *