इंग्लंडचा पराभव आणि पाकिस्तान खुश ; जाणून घ्या समीकरण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर | वर्ल्ड कप २०२३ मध्ये इंग्लंडचा संघ चौथा सामना हरला आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध इंग्लंड संघ (ENG vs SL) पूर्णपणे अपयशी ठरला. गतविजेता संघ श्रीलंकेसमोर पार गुडघे टेकतांना दिसला. या सामन्यात इंग्लिश संघ श्रीलंकन संघाला बरोबरीची टक्करही देऊ शकला नाही. इंग्लंड संघाला फलंदाजी करताना सोप्या विकेटवर केवळ १५६ धावा करता आल्या. यानंतर श्रीलंकेने लक्ष्य सहज गाठले. इंग्लंडचा ५ सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. जोस बटलरच्या संघाच्या या पराभवामुळे पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये मोठा फायदा झाला आहे.

पाकिस्तानला फायदा कसा?
विश्वचषक २०२३ मधील उपांत्य फेरीबद्दल बोलायचे तर भारताने आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेची कामगिरी पाहता तेही अंतिम ४ मध्ये जाणार हे निश्चित दिसत आहे. अशा स्थितीत चौथ्या जागेसाठी अनेक दावेदार आहेत. ऑस्ट्रेलियाने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने ५ पैकी दोन सामने जिंकले आहेत. याशिवाय अफगाणिस्तान आणि श्रीलंकेनेही ५ पैकी २ सामने जिंकले आहेत. श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर इंग्लंडचा संघ शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्धचा पराभव गतविजेत्या इंग्लंडला चांगलाच भारी पडला आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टक्कर
अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांना एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे. अशा स्थितीत पराभूत संघासाठी अडचणीचे समीकरण ठरणार आहे. यासोबतच अफगाणिस्तानला अजूनही अनेक मोठ्या संघांसोबत सामने खेळायचे आहेत आणि अपसेट हे रोज घडत नाहीत. अशा स्थितीत आता उपांत्य फेरीत चौथ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे.

भारत-पाकिस्तान सामना, स्टेडिअममध्ये ‘जय श्री राम’चा जयघोष
२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचे भवितव्य अजूनही त्यांच्याच हातात आहे. संघाचे चार सामने बाकी असून त्यांना सर्व सामने जिंकायचे आहेत. त्यांना अजूनही दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याशी सामने खेळायचे आहेत. यातील एकही सामना सोपा असणार नाही. मात्र बाबर आझमच्या संघाने सर्व ४ सामने जिंकले तर उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान जवळपास निश्चित होईल. मात्र, हा क्रिकेटचा खेळ असून शेवटच्या गट सामन्यापर्यंत काहीही फेरबदल होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *