Healthy Soups for Cold-Cough : थंडीचे दिवस आता सुरू सर्दी-खोकल्यापासून आराम देतील ‘हे’ हेल्दी सूप्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर | Healthy Soups for Cold-Cough : थंडीचे दिवस आता सुरू झाले आहेत. पावसाळा आल्यावर आणि थंडी सुरू झाल्यावर सर्दी-खोकला, घसा खवखवणे आणि ताप येणे इत्यादी समस्या सुरू होतात. या समस्या जरी नॉर्मल असल्या तरी यामुळे होणारा त्रास भयंकर असतो. सर्दी-ताप, खोकल्यामध्ये आपले अंग दुखते, तोंडाची चव जाते, डोकेदुखी होते आणि थंडी वाजते.

या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपायांची देखील मदत घेऊ शकतो. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक उपाय आहेत. ज्यामुळे, सर्दी-खोकल्या सारख्या किरकोळ समस्या दूर होण्यास मदत होते. या परिस्थितीमध्ये एक वाटी गरम सूप आपल्याला सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवून देते. त्यामुळे, आहारात पौष्टिक गरम सूपचा जरूर समावेश करावा.

हे सूप्स आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय, या सूप्समध्ये तुम्ही कांदा, लसूण, काळी मिरी आणि इतर हंगामी भाज्यांचाही समावेश करू शकता. हे सर्व घटक वापरून आपण हेल्दी सूप्स बनवू शकतो, हे हेल्दी सूप्स आपल्याला सर्दी-खोकल्यापासून आराम नक्कीच मिळवून देतील. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे सूप्स? आणि हे सूप्स बनवण्याची पद्धत.

मिक्स व्हेजिटेबल सूप
हे नावाप्रमाणेच मिक्स व्हेजिटेबल सूप आहे. हे चवीला ही छान लागतं आणि ताप-सर्दी झाल्यावर हे गरम सूप जरूर प्यावे. हे सूप तयार करण्यासाठी एक भांड किंवा पॅन घ्या. आता त्यामध्ये थोडे तेल घाला. आता या तेलामध्ये थोडा चिरलेला कांदा घाला. ढोबळी मिरची घाला आणि इतर तुमच्याकडे असतील त्या हंगामी भाज्या घाला.

आता हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्या. छान मिक्स झाल्यावर त्यामध्ये थोडे पाणी मिसळा. आता १५-२० मिनिटे हे मिश्रण चांगले शिजू द्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही यात मीरेपूड आणि मीठ घाला. नंतर गरमागरम सर्व्ह करा.

टोमॅटो आणि तुळशीचे सूप
सर्दी-तापाने आजारी पडल्यावर तोंडाची चव जाते, सगळं बेचवं लागत. अशा परिस्थितीमध्ये हे टोमॅटो-तुळशीचे सूप आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या सूपामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंन्ट्स आणि इतर पोषक घटक असतात. जे आपल्याला आजारांसोबत लढायला मदत करतात.

हे सूप तयार करण्यासाठी एक कढई घ्या. त्यामध्ये तेल घाला. या तेलामध्ये आता लसूण घाला. हा लसूण चिरून घ्या किंवा ठेचून त्यामध्ये घालू शकता. आता लसूण चांगला तळून झाल्यावर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो आणि मीठ घाला.

हवे असल्यास यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून हे मिश्रण चांगले मिसळून घ्या. शेवटी त्यामध्ये तुळशीची पाने घालून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. १५ मिनिटे शिजू द्या, त्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *