मुंबई विमानतळावरून दररोज होणार तब्बल 975 विमानांचं उड्डाण; हिवाळी वेळापत्रकाची घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । मुंबई विमानतळ प्राधिकरणाने (Mumbai Airport Authority) २९ ऑक्टोबरपासून ३० मार्च २०२४ पर्यंत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळी वेळापत्रकात आठ टक्के उड्डाणांची संख्या वाढणार आहे.

हिवाळी वेळापत्रकानुसार (Winter Schedule) मुंबई विमानतळावरून दररोज ९७५ विमानांचे उड्डाण होणार आहे. त्याशिवाय ११५ ठिकाणी नवीन विमान सेवा (Airline Service) सुरू केली गेली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या हंगामात पर्यटकांची संख्या वाढते. विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या त्यात जास्त असते. त्यांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई विमानतळ प्रशासनाने यंदाच्या हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. अलमाटी आणि बालीकडे नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांसह एअर कॅनडा आणि अझरबैजान एअरलाईन्सद्वारे नव्या सेवांचा विस्तार होणार आहे.

हृदयद्रावक! पूजा करुन परतताना काळाचा घाला; ट्रकच्या भीषण अपघातात 13 जण ठार; मृतांत मुलांसह आठ पुरुष, चार महिलांचा समावेश
मुंबईला जाणाऱ्या आणि तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एन्टेबे, लागोस आणि इतर अनेक आफ्रिकन स्थळांना भेट देता येणार आहे. मध्य पूर्वेतील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी असलेल्या ‘एमिरेट्स एअरलाइन्स’ने १९ ऑक्टोबर २०२३ पासून भारतात आपला प्रीमियम इकॉनॉमी केबिन क्लास सादर केला आहे. ज्याची सुरुवात मुंबई विमानतळापासून होत आहे. ३० ऑक्टोबरपासून एअरलाईन अधिकृतपणे केबिन क्लास सुरू करणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *