कांगारूंचा देश ऑस्ट्रेलिया अब दूर नही! मुंबई-मेलबर्न सेवा डिसेंबरपासून

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ नोव्हेंबर ।। ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी मुंबईतून लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार असून, एअर इंडियाचे पहिले विमान १५ डिसेंबरला मेलबर्नसाठी उड्डाण करेल. आठवड्यातून तीनदा ही सेवा उपलब्ध असेल.

गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने ही थेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी तीन दिवशी ही विमाने सेवा उपलब्ध आहे. या प्रवासासाठी बोईंग ७८७-८ ड्रिमलायनर नियुक्त असेल. यामध्ये बिझनेस क्लासच्या आरामदायी १८ जागा असून, इकोनॉमी क्लासच्या २३८ जागा आहेत.

प्रवासी आसन क्षमतेमध्ये वाढ
सध्या दिल्ली ते ऑस्ट्रेलियासाठी रोज विमानसेवा उपलब्ध असून, आठवड्याला २८ फेऱ्या सिडनी व मेलबर्न या शहरांसाठी होतात.
मुंबईतून सुरू असलेल्या या नव्या फेऱ्यांमुळे ऑस्ट्रेलिया येथे जाणाऱ्या प्रवासी आसन क्षमतेमध्ये ४० हजारांनी वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *