Railway News: रेल्वे झाली मालामाल; आठ महिन्यात झाला इतक्या हजार कोटींचा महसूल जमा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ डिसेंबर ।। Railway News: मध्य रेल्वेवर गेल्या आठ महिन्यात १२ हजार ४९७ कोटीचा महसूल जमा केला आहे. ज्यामध्ये प्रवासी वाहतुकीतून चार हजार ६९९ कोटी तर मालवाहतुकीतून ६ हजार १४६ कोटीपेक्षा जास्त महसूलाच्या समावेश आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरुन दररोज सुमारे ३५ ते ३६ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात मध्य रेल्वेने एकुण एक हजार ३९ दशलक्ष प्रवाशांची वाहतुक केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९४०.७८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली होती.

म्हणजेच प्रवासी संख्येत १०.४६ टक्के वाढ झाली आहे.या प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत ४६९१.१० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत ४०७७.६२ कोटी रुपये महसूल मिळवला होता. नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेने एकुण १३१.५६ दशलक्ष प्रवाशांची वाहतुक केली,त्यातून ५९५ कोटी ५६लाखांचा महसुल घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *