Gold and Silver : सोन्या,चांदीला उजाळा ; पहा आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ डिसेंबर ।। गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर वाढत चालल्याचे दिसत असून, गुरुवारी सोन्याच्या दरात 430 रुपयांनी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 64,250 रुपये प्रतितोळा झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही 300 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी चांदीचा दर प्रतिकिलो 79,500 रुपये प्रतिकिलो होता. अर्थात जीएसटी आणि अन्य करांमुळे सोने-चांदीच्या किमती विविध ठिकाणी थोड्याफार फरकाने कमी-जास्त असतात. (Gold and Silver)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून लग्नसराईच्या काळात सोन्याला चांगली झळाळी मिळाली आहे. गुडरिटर्न्सनुसार गुरुवारी 18 कॅरेट सोन्याचा दर 48,190 रुपये प्रतितोळा, 22 कॅरेट सोन्याचा दर 58,900 रुपये प्रतितोळा, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64,250 रुपये प्रतितोळा होता. (Gold and Silver)

गुरुवारी चांदीच्या दरातही 300 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानुसार गुरुवारी चांदाचा दर प्रतिकिलो 79,500 रुपये होता. देशातील चार प्रमुख महानगरांचा विचार केला तर 24 कॅरेट सोने चेन्नईत 450 रुपयांनी, दिल्लीत 440 रुपयांनी, तर मुंबईत आणि कोलकाता येथे 430 रुपयांनी महागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *