Ayodhya Ram Temple : … म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. 21 जानेवारी ।। सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्या मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला हजर राहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत सोहळ्यासाठी जाणार नसल्याचं म्हटलं आहे. आता निमंत्रण मिळालं असूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनीही अयोध्येला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी जाणार नाही, असं ट्वीट केलं आहे.

… म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, ‘जय श्री राम… अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार…’

‘अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.’ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *