लालकृष्ण अडवाणी प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, कारण…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. 22 जानेवारी ।। अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमत्त देशभरात उत्सहाचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्ण देश राममय झाला आहे. अयोध्याही प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त सजली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नेते, कलाकार, खेळाडू अयोध्या नगरीत दाखल झाले आहे. अशातच भाजपाचे ज्येष्ठ नेते, लालकृष्ण आडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीत.

लालकृष्ण अडवाणी यांचं श्री राम मंदिरासाठी मोठं योगदान राहिलं आहे. पण, अडवाणी यांनी अयोध्येचा दौरा रद्द केला आहे. खराब वातावरण आणि थंडीमुळे हा दौरा रद्द केला आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. ‘इंडिया टुडे’नं हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी या भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट असल्याचं म्हटलं होतं.

अयोध्येत कसं आहे वातावरण?
अयोध्येत सकाळी ६ वाजता ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत थंडीचं वातावरण कायम राहणार आहे. कमीत कमी ७ अंश तर अधिक अधिक १६ अंश सेल्सिअस तापमान राहू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *