Mithun Chakraborty : दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० फेब्रुवारी । दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तीं यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. रिपोर्टनुसार, त्यांना शनिवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना तत्काळ (Mithun Chakraborty) कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Mithun Chakraborty) पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिथुन चक्रवर्ती ७३ वर्षांचे आहेत. ते सध्या कोलकाता येथे आहेत. १० फेब्रुवारीला सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामकाजात ते बिझी होते. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रिपोर्टनुसार, त्यांना छातीत दुखू लागल्याने मिथुन दा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *