Google I/O : गुगलच्या मेगा इव्हेंटची तारीख ठरली! या दिवशी लाँच होऊ शकतं Android 15 आणि Pixel 8a स्मार्टफोन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मार्च ।। Google I/O 2024 : गुगलने आपल्या डेव्हलपर्स कॉन्फरन्सची तारीख जाहीर केली आहे. गुगलच्या I/O इव्हेंटमध्ये कित्येक मोठ्या घोषणा होणार आहेत. 14 मे रोजी हा इव्हेंट पार पडेल. या कॉन्फरन्समध्ये अधिक भर एआयवर असणार आहे. सोबतच या इव्हेंटमध्येच Google Pixel 8a लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


गुगलचा वार्षिक इव्हेंट
I/O हा गुगलचा वार्षिक इव्हेंट आहे. यामध्ये कित्येक डेव्हलपर्स, टेक प्रेमी आणि इतर डेलिगेट्स सहभागी होतात. यामध्ये कंपनी आपल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देते. यावर्षीचा लाईव्ह इव्हेंट कॅलिफोर्नियातील शोरलाईन अ‍ॅम्पीथिएटरमध्ये होणार आहे.

या इव्हेंटचे होस्ट गुगलचे सीईओ सुंदर पिचाई असतील. या इव्हेंटमध्ये गुगल लेटेस्ट डेव्हलपर्स प्रॉडक्ट्स, टेक्नॉलॉजी आणि हार्डवेअर सादर करेल. काही प्रॉडक्ट्स लाँच देखील करण्यात येतील. यातच अँड्रॉईड 15 देखील लाँच होण्याची शक्यता आहे. Android 15 चा प्रीव्ह्यू कंपनीने आधीच सादर केला आहे.

गुगल पिक्सेल 8 ए
गेल्या वर्षीच्या I/O इव्हेंटमध्ये गुगलने आपला पिक्सेल 7a स्मार्टफोन लाँच केला होता. त्यामुळे यंदाच्या इव्हेंटमध्ये गुगल Pixel 8a लाँच करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पिक्सेल 8एचं डिझाईन Pixel 8 सीरीजप्रमाणेच असेल असं म्हटलं जात आहे.

यासोबतच या इव्हेंटमध्ये एआय संबंधित प्रॉडक्ट्स, अँड्रॉईड XR आणि इतर नवे प्रॉडक्ट्स लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे, की गुगल Pixel Fold 2 देखील लाँच करेल. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *