Bajaj CNG Bike : बजाजच्या ‘सीएनजी’ दुचाकीची चाचणी सुरू ; कसे असेल डिझाईन अन् मायलेज ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मार्च । Bajaj CNG Bike Mileage : सध्या टू-व्हीलर सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त चर्चा बजाजच्या सीएनजी बाईकची आहे. या गाडीची चाचणी होत असतानाचे काही फोटो सध्या लीक झाले आहेत. यावरुन या गाडीचं डिझाईन कसं असू शकेल याचा अंदाज लावण्यात येत आहे. याआधी देखील या गाडीबद्दल कित्येक गोष्टी मीडिया रिपोर्टमध्ये समोर आल्या आहेत.

काय असेल नाव?
ऑटोकार इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, या गाडीचं नाव ‘ब्रूझर’ असं असू शकतं. सध्या बजाजकडे कम्युटर सेगमेंटमध्ये तीन प्रकारचे इंजिन उपलब्ध आहेत. 102cc, 115cc आणि 124cc असे तीन इंजिन बजाजकडे आहेत. यातील कोणतं इंजिन सीएनजी गाडीमध्ये लावण्यात येईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. एकाच किंवा विविध प्रकारच्या इंजिन व्हेरियंटसह देखील ही गाडी लाँच केली जाऊ शकते.

कसं आहे डिझाईन?
लीक झालेल्या फोटोंमध्ये पूर्ण गाडीचं डिझाईन लक्षात येत नाही. मात्र, एलईडी हेडलाईट, फ्रंट काउल, नकल गार्ड आणि 5-स्पोक अलॉय व्हील देखील दिसत आहे. यामध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक दिसत आहे. CNG टँक हा सीट आणि पेट्रोल टँक असतो त्या जागेच्या खाली दिसत आहे. यामध्ये बाय-फ्युएल सेटअप (Bi-fuel Setup) असण्याची देखील शक्यता मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *